Sunday, April 26, 2015

असंदिग्ध

त्या उदास संध्याकाळी, एकांताच्या उंच शिखरावर,मनाच्या खोलात अजुनही, रम्य वास्तव कुठेतरी आहे॰
कुणाची तरी संगत फक्त तिथे आहे॰ अव्यक्त जाणीवांच्या लहरी काळाचे बांध तोडून पायांना स्पर्श करताहेत॰ मन उदास इथे, पण पुर्णपणे निश्चिंत तिथे॰
हा भुतकाळ, भविष्यकाळ कि फक्त मृगजळ? कि काळाला भुत आणि भविष्यात तोडुन आपण करतोय भयंकर चुक? 
या असंदिग्ध वाटणार्या भावनेच्या मुळाशी आहे चिरंतन प्रसंन्नता, ह्या साक्षात्कारानेच उदासीनतेची धुळ काहिशी पुसल्याचा भास मात्र नक्की होत आहे ॰

No comments: