का कुणास ठाऊक, आज जाणवत आहे हरवलेली निरागसता. निखळ हास्य हरवुन गेलय कुठेतरी . का अस झाल असेल याचा शोध गेताना सापडते विषण्णता. पैसा , प्रगती, ध्येय हेच आहे का सगळ काही ? मला नाही वाटत. कुठे तरी खोल , अजुन निरागसता टिकून आहे. ती परत सापडेल अशी आशा नक्की आहे , पण नेहमी अस आशावादी राहाण पण दिवसेंदिवस कठीण होत चाललंय…
ह्या जिद्दीचा पण कंटाळा येतो . का इतक कठीण आहे हसण? मला स्वच्छंदी जगायचं, ह्या जाणिवेचे क्षणभंगुर अस्तित्व कायमचे नष्ट करायचं . का हव बाह्य ध्येय? फक्त हसण ध्येय असु शकत नाही का? सतत काहीतरी मिळवायचं, काहीतरी करायचं, कुठेतरी जायचय… का? फक्त आणि फक्त असू शकत नाही का? एका फुलासारखं. काय कमवायचं असत फुलाला? त्याच आयुष्य फक्त 'असत'.
पण मग वाटत , मिळालाच आहे आयुष्य तर होऊन जाऊदे… सगळ काही एका ध्येयामागे देऊन टाकाव. वेडेपणाच्या सगळ्या सीमा तोडून टाकाव्यात. त्या वेडेपणात मिळेल ती निरागसता . कदाचित हेच सत्य आहे. कदाचित नाही .